केसांसाठी रसायनयुक्त साबण किंवा शैम्पू वापरणे टाळावे, कारण त्यामुळे केसांतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केस कोरडे, ठिसूळ होऊ शकतात. त्याऐवजी, शिकेकाई, रिठा, आवळा साबण सारखे नैसर्गिक साबण वापरावेत जे केस स्वच्छ करतात आणि नैसर्गिक तेल न काढता मऊपणा टिकवून ठेवतात.
केसांसाठी रासायनिक साबण वापरण्याचे तोटे :
- सामान्य साबण केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकतो, ज्यामुळे केस कोरडे आणि कुरळे होतात.
- pH पातळीत असंतुलन: साबणांचा pH जास्त असतो, ज्यामुळे केसांची नैसर्गिक आम्लता बिघडते आणि केस कमकुवत होतात.
- केसांच्या समस्या: यामुळे कोंडा, खाज आणि केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.
केसांसाठी योग्य घटक: केसांचे आरोग्य सुधारते आणि ते चमकदार व मुलायम बनतात.
शिकेकाईचे फायदे – नैसर्गिक क्लीन्झर असल्याने टाळू आणि केसांतील अशुद्धी काढून टाकतो, पण नैसर्गिक तेल कमी करत नाही.टाळूला सौम्यपणे स्वच्छ करते आणि नैसर्गिक पीएच संतुलन राखते. केसांमधील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकते.केस कोरडे न करता स्वच्छ करते.
मेहंदीचे फायदे – केसांना नैसर्गिकरीत्या रंग देते, केसांची वाढ होण्यास मदत करते, केसांना मजबूत आणि चमकदार बनवते.
आवळ्याचे फायदे – केस गळणे कमी करते, अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते, केसांना मजबूत आणि निरोगी बनवते.
रिठ्याचे फायदे – केसांना नैसर्गिक चमक आणि मुलायमपणा देतो, केसांमधील कोंडा आणि घाण काढण्यास मदत करतो, केसांना नैसर्गिकरीत्या स्वच्छ करते.
केसांसाठी योग्य साबण : हे सर्व घटक एकत्र वापरल्यास केसांचे आरोग्य सुधारते आणि ते चमकदार व मुलायम बनतात. केसांना चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी हे मिश्रण खूप उपयुक्त आहे. एकत्र वापर करण्याचे फायदे हे सर्व घटक एकत्र वापरल्यास केस गळती थांबते आणि केस लांब व दाट होतात.

शिकेकाई, मेहंदी, आवळा आणि रिठा यांचा वापर केल्याने –
- केसांना चमक येते,
- केस गळणे कमी होते,
- केसांची वाढ सुधारते,
- हे घटक केसांना नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात,
- त्यांची वाढ होण्यास मदत करतात,
- त्यांना मजबूत बनवतात.
– Nirmalam