नुकताच एक इंग्रजी लेख वाचला। अप्रतिम लेख होता तो । त्या लेखामध्ये जगातील यशस्वी व्यक्तींच्या यशाचे गुपित उलगडून सांगण्यात आले होते ।
जगातील यशस्वी व्यक्ती यशस्वी का असतात ह्याचे मूल्यांकन ह्या लेखात करण्यात आले होते, त्यांच्या यशाची सूत्र, त्यांच्या सवयी इत्यादी , आणि एक गोष्ट जी ह्या सर्वामध्ये समान होती , ती म्हणजे वाचन !!!
हो, बरोबर ऐकले तुम्ही, वाचनाच्या जोरावर आज ते एवढे यशस्वी झाले । त्यांच्या मते वाचन म्हणजे यशाची गुरुकिल्ली ।
आता आपल्या काहींच्या मनात प्रश्न येईल सुद्धा की आपण ही खूप वाचन करतो, आपण शिकलो ही खूप , मग ते का एवढे यशस्वी ??
उत्तर अगदी सोपे आहे, आपण वाचन करतो, पण ते marks मिळवण्यासाठी, आपण वाचतो छंद म्हणून, आपण वाचतो मनोरंजन म्हणून, आणि एकदा का आपले वाचून झाले की आपण सगळे विसरून जातो ।
पण, यशस्वी व्यक्ती वाचन करतात ते शिक्षित होण्यासाठी, जे वाचले ते आत्मसात करून अंमलात आणण्यासाठी । महिन्यातून कमीतकमी दोन तरी पुस्तके वाचावीत ह्याकडे त्यांचा कल असतो । ही मंडळी एवढे व्यस्त असतात की दिवसभर ह्यांना फुरसत कशी मिळत असेल बरे वाचायला , तर त्यांनी दिलेले उत्तर घेण्यासारखे होते । ते म्हणाले आम्ही आमच्यासोबत नेहमी एक पुस्तक ठेवतो आणि जेव्हा कधी फावला वेळ मिळतो तेव्हा वाचन करतो ।
एकाने त्यांना विचारले की तुम्ही एवढे यशस्वी आहात, मग आता का वाचता तुम्ही पुस्तके??, तर त्यांनी उत्तर दिले की पुस्तकांमुळेच त्यांना नवनवीन कल्पना सुचल्या, विचारशक्ती विकसित झाली, जेणेकरून ते यशस्वी होऊ शकले, पण हे यश टिकवण्यासाठी त्यांना अजून वाचन करणे गरजेचे आहे कारण यश मिळवण्यापेक्षा ते टिकवण्यासाठी अधिक मेहनत व हुशारी लागते, जी आम्हाला ह्या पुस्तकांतून मिळते । प्रत्येक पुस्तकातुन ज्या सकारात्मक गोष्टी शिकतात, त्या ते अंमलात आणतात ।
काहींनी तर असे मत मांडले की पुस्तके वाचता यावीत म्हणून आम्ही TV व मोबाईलचा वापर टाळतो किंवा कमी करतो ।
खरेच, मित्रांनो आज तुम्हालाही यशाची गुरुकिल्ली समजली आहे, तर लागा कामाला,
जमेल तेव्हा वाचन करा, जमेल तेवढे वाचन करा ।
एका गोष्टीची परत आठवण करून देतो, ” वाचाल तर वाचाल “
सगळ्यांना यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा ।।।

ABLES Education and Career Coach