खरंतर आपला देश विविधतेने नटलेला देश आहे, पण ह्या विविधतेला एकरूप करणे जर कोणाला साध्य झाले तर तो आपला ‘तिरंगा’
जेव्हा हा ‘तिरंगा’ आकाशात फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान आणि शान अभिमानने उंचावते.
आपला भारत स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरा करणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाला नवीन दिशा दाखवण्यास सज्जही होणार आहे.
याचवर्षी आपल्या राष्ट्रगीताला जगातले सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. त्याच क्षणाला अजून अविस्मरणीय करण्याची संधी प्रत्येक भारतीयाला लाभणार आहे ती ‘हर घर तिरंगा’ ह्या मोहिमेतून.
या माझ्या भारतवासियांनो, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया. आपण सगळे मिळून ह्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार बनुया आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून, राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला वंदन करुया 🙏
अवकाशातूनही ह्या १५ ऑगस्टला दिसेल फक्त आपला ‘ तिरंगा ‘

जय तिरंगा !!!