व्यक्तिमत्वविकास का करावा???

व्यक्तिमत्व म्हणजे काय ?, ह्याबद्दल खूप जणांच्या मनात संभ्रम आहे. अनेकांना असे वाटते की व्यक्तिमत्व हे फक्त चांगला job मिळवण्यासाठी मर्यादित आहे. पण मित्रांनो असे नाही आहे कारण व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुमची शारीरिक,बौद्धिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, आणि अध्यात्मिक उन्नती.

एका उद्योजकांना प्रश्न विचारण्यात आला होता,”बेरोजगारी का वाढली आहे ?”, तर त्यांनी असे उत्तर दिले “रोजगार खूप प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यासाठी शिकलेले विद्यार्थीही आहेत पण त्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन (positive attitude), तसेच भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुठल्याही व्यक्तीला त्याच्या personal तसेच व्यावसायिक आयुष्यात यशस्वी बनण्यास मदत करतात.”

आपण अभ्यास करतो, चांगले गुणही मिळवतो, पण आपल्याला प्रश्न आणि उत्तरं माहीत असतात. आपल्याला ती समजून, पाठ करून परीक्षेत उत्तरे लिहायची असतात. पण जीवनात असे नसते. कधी, कुठे आपली परीक्षा असेल हे आपल्याला माहीत नसते. काय syllabus असेल, काय प्रश्न असतील, कुठले उत्तरं सर्वोत्तम असेल ह्याची आपल्याला जाणीव नसते. अश्या परिस्थितीत एकमेव गोष्ट जी आपल्याला साथ देते ती म्हणजे आपले व्यक्तित्व.

ह्या सर्व गोष्टींची जाणीव मला श्री.अमोल पालेकरांचा एक चित्रपट पाहिल्यावर झाली. त्यांनी साकारलेले पात्र चांगले शिक्षित असते, चांगली नोकरीही असते, पण त्यामध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमतेचा आणि संवादकौशल्याचा अभाव असतो. त्या पात्रास ह्या गोष्टींचा खूप त्रास होता असतो – कामामध्ये, नात्यामध्ये, आणि सामाजिक जीवनात. मग त्या पात्रास एका व्यक्ती बद्दल माहिती होते, ती व्यक्ती श्री.अशोक कुमार ह्यांनी साकारली होती. त्या चित्रपटात आपल्या विचारक्षमतेवर कसे काम करावे, कसे निर्णय घ्यावेत, ह्या अनेक गोष्टींचे training दाखवण्यात आले होते. त्या training मुळे ते पात्र आपल्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडवून आणते, हे त्या चित्रपटात पाहण्यासारखे होते.

तेव्हा एका गोष्टीची जाणीव झाली, व्यक्तीच्या जीवनात दोन स्थिती महत्वाच्या असतात – एक परिस्थिती आणि दुसरी म्हणजे मनस्थिती. जेव्हा परिस्थिती हावी होते तेव्हा अपयश येते आणि जेव्हा मनस्थिती बळकट असते तेव्हा व्यक्ती यशाकडे वाटचाल करतो. हीच मनस्थिती बळकट करण्याचे साधन म्हणजे व्यक्तिमत्व विकास…✍️

Unknown's avatar

Author: ABLES INDIA

I welcome all of you to ABLES INDIA, a journey to lead happy, prosperous, and successful life. Mr Amol Dixit

Leave a comment