प्रवास हा सतत सुरूच असतो,
बसलो असेल आपण जरी शांत,
तरी मन सैरावैरा पळत असते,
कधी भूतकाळात तर भविष्यात डोकावत असते.
प्रवास हा सतत सुरूच असतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो.
आपले वय दिसू नये,
असे प्रत्येकालाच वाटते,
पण कोणाची पर्वा न करता,
ते आपले सतत वाढतच असते,
मेकअप काय आणि botox काय,
त्यावर काहीच कंट्रोल नसतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो.
जगातील सगळी घड्याळे जरी बंद पडली,
तरी समय कधीच थांबत नसतो,
सूर्य पूर्वेला आणि चंद्र पश्चिमेला उगवतच असतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो.
श्वास संपल्यावर,
आपला प्रवास थांबला तरी,
जगाचा प्रवास,
कधीच थांबत नसतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो,
प्रवास हा सतत सुरूच असतो.
