Excuses don’t give results. People in a comfort zone with negative attitude tend to give excuses.
Know your priorities, develop thoughts, habits, and skills accordingly. Always give your best to achieve your goals with positive attitude; but Never Ever Give Excuses…
Success requires continuous and consistent efforts.
Always learn new things, always try to do new things. It will help you to be out of your ‘comfort zone’ leading you to a ‘learning zone’ and then to ‘Success’.
नुकतेच एका वाहिनीवर एक बातमी दाखवण्यात आली की पुण्याच्या हिंजवडीतील IT park मध्ये मराठी employees चा टक्का फक्त २% आहे. आश्चर्य आहे ना, आपल्याच पुण्यात, आपलीच मराठी मुलंमुली एवढ्या अत्यल्प प्रमाणात…
आपली मराठी मुलंमुली अभ्यासात एवढे हुशार. आपल्याकडे MBA, MCA, Engineers, ITI तसेच अनेक क्षेत्रात graduates, Post-graduates…एवढे शिकलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. ह्यांच्या शिक्षणावर पालकांनी लागेल तेवढा खर्च केलेला असतो. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर खूप कमीच विद्यार्थी पुढे job मिळवतात. काही विद्यार्थी job न मिळाल्यावर पुढचे शिक्षण घेत राहतात तर काही जण मिळेल ते काम करतात. घरी सगळं सधन असल्यास काही विद्यार्थी घरचा व्यवसाय करतात किंवा शेती करतात.
काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात पण मुलाखतीत विचारला जाणारा ‘ Tell me about yourself?’ ह्या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांना अपयश येते. का येत असावे हे अपयश ???
अशी अनेक उदाहरणे आहेत की distinction मिळालेले विद्यार्थीसुद्धा soft skills चा अभाव असल्यामुळे interviews मध्ये reject झाले आहेत.
ह्याचा विचार ना विद्यार्थी करतात, ना पालक ना शिक्षण संस्था. फक्त अभ्यासात चांगले गुण मिळवणे एवढेच उद्दीष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यांच्या positive attitude, emotional intelligence, intrapersonal skills, interpersonal skills, communication skills, आणि interview skills ह्या soft skills कडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. पण अनेक companies ह्यांच्या मते, job मिळवण्यासाठी किंवा successful होण्यासाठी IQ पेक्षा EQ, तसेच Hard skills पेक्षा Soft skills जास्त महत्वाचे आहेत. म्हणून तर Soft skills ला Employability skills ( रोजगार कौशल्य ) असे ही संबोधले जाते.
आपण जेव्हा एखादी छोटीशी वस्तू घेतो तेव्हा ती पारखून घेतो मग शिक्षण घेताना आपण नक्कीच पारखून घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होतो आहे का?, हे पाहणे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच आहे. शिक्षण घेऊन नुसते certificate घ्यायचे की ते certificate मिळवून चांगले career घडवायचे हे प्रत्येक विद्यार्थ्याने तसेच पालकाने विचार करण्याची गरज आहे…✍️
We, in human history, have dealt with many epidemics, pandemics, and deadly viruses which took a heavy toll on human lives or hampered it.
The recent one was Corona Virus, which affected us physically, mentally, socially, and financially. It slowed down the growth, forced us to wear masks, keep social distance even with our loved ones, and quarantined us for more than a year. But thanks to medical science, we found vaccines for it. Though not completely, we are somehow safe now.
But though we are successful in dealing with many deadliest viruses, we knowingly avoided facing the most prevailing virus, that infected only the human race since its evolution. It led to many wars, massacres, colonization, invasion, and violence; that virus is a ‘Virus of Negativity’. Many superpowers and well-known scientists have conveniently ignored that virus as they knew it would be difficult to find a vaccine for it.
Though the degree may differ, the virus has infected everyone. Countries, societies, and families with the most infected people; are compelled to live in an unhappy environment. Due to that virus, there is an imbalance in everything.
Some of the symptoms seen in people highly infected with ‘Virus of Negativity’ are as follows:
They are egoistic;
They think of themselves as superior and others as inferior;
They are jealous of others’ success or progress and try to bring them down by hook or crook;
They try to dominate others, harass others, and humiliate others;
They are always unhappy and always search for wrong in everything;
They are pessimists;
They blame others.
One can now realize how dangerous these infected people are. These people look normal, but deep in thought, they are very lethal. If untreated, every body cell, tissue, and organ gets diseased, showing symptoms of various illnesses. It is the most contagious virus of all time, as it can spread without being in contact. Also, no one has yet developed any technique/machine to diagnose it.
The only way to stop this virus is to be happy and have a positive attitude.
It’s high time for everyone to work on themselves to remain immune from the virus, or it will keep on destroying the beauty of Life…✍️
दोघेही अभ्यासात चांगले होते. अंतिम परीक्षेत रमेशने ९०% गुण मिळविले, तर सुरेशने ८०% मिळवले. या दोघांनाही एका नामांकित MNC मधून मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले.
मुलाखतीचे निकाल लागल्यावर प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला कारण रमेशची निवड होण्याऐवजी सुरेशला नोकरी मिळाली होती.
आता ही गोष्ट समजण्यापूर्वी, प्रथम मुलाखत काय असते हे समजून घेऊ या.
“मुलाखत” म्हणजे मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणाऱ्या दरम्यान झालेले संभाषण होय. मुलाखत घेणारा सामान्यत: काही माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारतो ज्याला मुलाखत देणारा उत्तर देत असतो
मुलाखती समोरासमोर आणि व्यक्तिशः असतात, परंतु तेथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेलिफोनिक मुलाखती देखील असू शकतात.
समोरासमोर मुलाखत दोन्ही पक्षांना संवाद साधण्यास आणि एक दुसर्यास समजण्यास मदत करते. त्यासाठी मुलाखत देणाऱ्यास उत्तर पाठ करण्याची आवश्यकता नसते, परंतु तुम्ही कसा प्रतिसाद द्यावा याचा विचार करणे गरजेचे असते. नोकरीच्या मुलाखतीसाठी तुम्ही जितकी अधिक तयारी करता तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल.
मुलाखत घेणारे तुमचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी अनेक प्रश्न विचारतात, तसेच तुम्ही नोकरी आणि कंपनी या दोघांसाठी योग्य आहात की नाही हे ठरवतात.
मी काही प्रश्न नमूद केले आहेत जे मुलाखती दरम्यान विचारले जाऊ शकतात :
तुमच्याबद्दल सांग.
तुमचे छंद काय आहेत?
तुम्ही नोकरी का सोडत आहात?
तुम्ही आपली नोकरी का सोडली?
आम्ही तुम्हाला कामावर का घ्यावे?
तुमची पगाराची अपेक्षा काय आहेत?
कशामुळे तुम्हाला राग येतो?
तुम्हाला या कंपनीबद्दल काय माहित आहे?
तुम्ही प्रवास करण्यास तयार आहात का?
मुलाखती दरम्यान, मुलाखत घेणारे खालीलपैकी अर्जदारांच्या काही क्षमतांचे मूल्यांकन करतात:
ऐकण्याची क्षमता,
संभाषण कौशल्य,
लोकांशी जुळवून घेण्याची तसेच त्यांच्या बरोबर कार्य करण्याची क्षमता,
तपशीलांकडे लक्ष,
शिकण्याची वृत्ती,
काम करण्याची क्षमता,
भावनिक बुद्धिमत्ता,
रोजगार कौशल्य,
आवड,
आता तुम्हाला समजलेच असेल की सर्वोत्तम विद्यार्थी असूनही मुलाखतीची तयारी करणे आवश्यक आहे. मुलाखतीमध्ये तुमच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाते.
मला असे वाटते की एखाद्याने मुलाखतीची तयारी निरंतर चालू ठेवली पाहिजे कारण मुलाखत ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या अचेतन अवस्थेची ही चाचणी करते.
मुलाखतीत उमेदवार किती चांगली कामगिरी करतो हे प्रशिक्षणाच्या सहाय्याने वाढविले जाऊ शकते, हे संशोधनातून दिसून आले आहे.
प्रशिक्षण, मुलाखत देणार्या उमेदवारीची कौशल्ये, क्षमता आणि त्यांचे गुणधर्म समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करते तसेच हे कौशल्य विकसित करण्यास मदत करते. प्रभावी प्रशिक्षणामुळे मुलाखत देणार्याचे मुलाखतीबाबत ज्ञान वाढते, त्यामुळे मुलाखतीत अधिक चांगली कामगिरी होते.
टीप – कोणत्याही मुलाखतीसाठी कधीही तयारी न करता जाऊ नये; कारण त्यामुळे आत्मविश्वासला तडा जाऊ शकतो.
व्यक्तिमत्व म्हणजे काय ?, ह्याबद्दल खूप जणांच्या मनात संभ्रम आहे. अनेकांना असे वाटते की व्यक्तिमत्व हे फक्त चांगला job मिळवण्यासाठी मर्यादित आहे. पण मित्रांनो असे नाही आहे कारण व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुमची शारीरिक,बौद्धिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, आणि अध्यात्मिक उन्नती.
एका उद्योजकांना प्रश्न विचारण्यात आला होता,”बेरोजगारी का वाढली आहे ?”, तर त्यांनी असे उत्तर दिले “रोजगार खूप प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यासाठी शिकलेले विद्यार्थीही आहेत पण त्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन (positive attitude), तसेच भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुठल्याही व्यक्तीला त्याच्या personal तसेच व्यावसायिक आयुष्यात यशस्वी बनण्यास मदत करतात.”
आपण अभ्यास करतो, चांगले गुणही मिळवतो, पण आपल्याला प्रश्न आणि उत्तरं माहीत असतात. आपल्याला ती समजून, पाठ करून परीक्षेत उत्तरे लिहायची असतात. पण जीवनात असे नसते. कधी, कुठे आपली परीक्षा असेल हे आपल्याला माहीत नसते. काय syllabus असेल, काय प्रश्न असतील, कुठले उत्तरं सर्वोत्तम असेल ह्याची आपल्याला जाणीव नसते. अश्या परिस्थितीत एकमेव गोष्ट जी आपल्याला साथ देते ती म्हणजे आपले व्यक्तित्व.
ह्या सर्व गोष्टींची जाणीव मला श्री.अमोल पालेकरांचा एक चित्रपट पाहिल्यावर झाली. त्यांनी साकारलेले पात्र चांगले शिक्षित असते, चांगली नोकरीही असते, पण त्यामध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमतेचा आणि संवादकौशल्याचा अभाव असतो. त्या पात्रास ह्या गोष्टींचा खूप त्रास होता असतो – कामामध्ये, नात्यामध्ये, आणि सामाजिक जीवनात. मग त्या पात्रास एका व्यक्ती बद्दल माहिती होते, ती व्यक्ती श्री.अशोक कुमार ह्यांनी साकारली होती. त्या चित्रपटात आपल्या विचारक्षमतेवर कसे काम करावे, कसे निर्णय घ्यावेत, ह्या अनेक गोष्टींचे training दाखवण्यात आले होते. त्या training मुळे ते पात्र आपल्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडवून आणते, हे त्या चित्रपटात पाहण्यासारखे होते.
तेव्हा एका गोष्टीची जाणीव झाली, व्यक्तीच्या जीवनात दोन स्थिती महत्वाच्या असतात – एक परिस्थिती आणि दुसरी म्हणजे मनस्थिती. जेव्हा परिस्थिती हावी होते तेव्हा अपयश येते आणि जेव्हा मनस्थिती बळकट असते तेव्हा व्यक्ती यशाकडे वाटचाल करतो. हीच मनस्थिती बळकट करण्याचे साधन म्हणजे व्यक्तिमत्व विकास…✍️
खरंतर आपला देश विविधतेने नटलेला देश आहे, पण ह्या विविधतेला एकरूप करणे जर कोणाला साध्य झाले तर तो आपला ‘तिरंगा’
जेव्हा हा ‘तिरंगा’ आकाशात फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान आणि शान अभिमानने उंचावते.
आपला भारत स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरा करणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाला नवीन दिशा दाखवण्यास सज्जही होणार आहे.
याचवर्षी आपल्या राष्ट्रगीताला जगातले सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. त्याच क्षणाला अजून अविस्मरणीय करण्याची संधी प्रत्येक भारतीयाला लाभणार आहे ती ‘हर घर तिरंगा’ ह्या मोहिमेतून.
या माझ्या भारतवासियांनो, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया. आपण सगळे मिळून ह्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार बनुया आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून, राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला वंदन करुया 🙏
अवकाशातूनही ह्या १५ ऑगस्टला दिसेल फक्त आपला ‘ तिरंगा ‘