Soft skills – a need of an hour (Marathi)

नोकरी किंवा व्यवसाय करण्यात अपयश का येते?

नुकतेच एका वाहिनीवर एक बातमी दाखवण्यात आली की पुण्याच्या हिंजवडीतील IT park मध्ये मराठी employees चा टक्का फक्त २% आहे. आश्चर्य आहे ना, आपल्याच पुण्यात, आपलीच मराठी मुलंमुली एवढ्या अत्यल्प प्रमाणात…

आपली मराठी मुलंमुली अभ्यासात एवढे हुशार. आपल्याकडे MBA, MCA, Engineers, ITI तसेच अनेक क्षेत्रात graduates, Post-graduates…एवढे शिकलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. ह्यांच्या शिक्षणावर पालकांनी लागेल तेवढा खर्च केलेला असतो. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर खूप कमीच विद्यार्थी पुढे job मिळवतात. काही विद्यार्थी job न मिळाल्यावर पुढचे शिक्षण घेत राहतात तर काही जण मिळेल ते काम करतात. घरी सगळं सधन असल्यास काही विद्यार्थी घरचा व्यवसाय करतात किंवा शेती करतात.

काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात पण मुलाखतीत विचारला जाणारा ‘ Tell me about yourself?’ ह्या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांना अपयश येते.  का येत असावे हे अपयश ???

अशी अनेक उदाहरणे आहेत की distinction मिळालेले विद्यार्थीसुद्धा soft skills चा अभाव असल्यामुळे interviews मध्ये reject झाले आहेत.

ह्याचा विचार ना विद्यार्थी करतात, ना पालक ना शिक्षण संस्था. फक्त अभ्यासात चांगले गुण मिळवणे एवढेच उद्दीष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यांच्या positive attitude, emotional intelligence, intrapersonal skills, interpersonal skills, communication skills, आणि interview skills ह्या soft skills कडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. पण अनेक companies ह्यांच्या मते, job मिळवण्यासाठी किंवा successful होण्यासाठी IQ पेक्षा EQ, तसेच Hard skills पेक्षा Soft skills जास्त महत्वाचे आहेत. म्हणून तर Soft skills ला Employability skills ( रोजगार कौशल्य ) असे ही संबोधले जाते.

आपण जेव्हा एखादी छोटीशी वस्तू घेतो तेव्हा ती पारखून घेतो मग शिक्षण घेताना आपण नक्कीच पारखून घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होतो आहे का?, हे पाहणे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच आहे.  शिक्षण घेऊन  नुसते certificate घ्यायचे की ते certificate मिळवून चांगले career घडवायचे हे प्रत्येक विद्यार्थ्याने तसेच पालकाने विचार करण्याची गरज आहे…✍️

Education and Career Coach

Virus of Negativity

We, in human history, have dealt with many epidemics, pandemics, and deadly viruses which took a heavy toll on human lives or hampered it.

The recent one was Corona Virus, which affected us physically, mentally, socially, and financially. It slowed down the growth, forced us to wear masks, keep social distance even with our loved ones, and quarantined us for more than a year. But thanks to medical science, we found vaccines for it. Though not completely, we are somehow safe now.

But though we are successful in dealing with many deadliest viruses, we knowingly avoided facing the most prevailing virus, that infected only the human race since its evolution. It led to many wars, massacres, colonization, invasion, and violence; that virus is a ‘Virus of Negativity’. Many superpowers and well-known scientists have conveniently ignored that virus as they knew it would be difficult to find a vaccine for it.

Though the degree may differ, the virus has infected everyone. Countries, societies, and families with the most infected people; are compelled to live in an unhappy environment. Due to that virus, there is an imbalance in everything.

Some of the symptoms seen in people highly infected with ‘Virus of Negativity’ are as follows:

  1. They are egoistic;
  2. They think of themselves as superior and others as inferior;
  3.  They are jealous of others’ success or progress and try to bring them down by hook or crook;
  4.  They try to dominate others, harass others, and humiliate others;
  5.  They are always unhappy and always search for wrong in everything;
  6.  They are pessimists;
  7.  They blame others.

One can now realize how dangerous these infected people are. These people look normal, but deep in thought, they are very lethal. If untreated, every body cell, tissue, and organ gets diseased, showing symptoms of various illnesses. It is the most contagious virus of all time, as it can spread without being in contact. Also, no one has yet developed any technique/machine to diagnose it.

The only way to stop this virus is to be happy and have a positive attitude.

It’s high time for everyone to work on themselves to remain immune from the virus, or it will keep on destroying the beauty of Life…✍️

Life Coach

Learn to say ‘NO’

नाही बोलायला शिका,
नकारात्मक विचारांना;

नाही बोलायला शिका,
त्या गोष्टींना ज्या तुमच्यासाठी अपायकारक आहेत;

नाही बोलायला शिका,
त्या गोष्टींना ज्या तुमच्यासाठी हानिकारक आहेत;

नाही बोलायला शिका,
त्या गोष्टींना ज्या तुमच्या यशात बाधक आहेत;

म्हणजे तुम्ही आपसूकच सकारात्मक आणि यशाला ‘ हो ‘ म्हणता !!!

https://youtu.be/EtHOs_c6qbA

देशहित सर्वोपरि ।।।

देशहित में जो है ।
वही सबके हित मे है ।
हम सबकी जीत , हिंदुस्तान की जीत में है ।

कुर्बान हो गए लाखो, इस देश को आज़ाद करने के लिए ।
आओ मिलके काम करे, इस देश को आबाद करने के लिए ।

सुजलाम सुफलाम देश हमारा, चलो इसे और सुजलाम सुफलाम बनाये ।
कोई पूछे धरती पे स्वर्ग कहा है , तो ‘मेरा भारत’ यही आवाज़ आये ।

देश है, तो हम् है ।
देश है, तो सब है ।
आओ मिलकर देश को और खुशहाल बनाये ।

देशहित में जो है ।
वही सबके हित मे है ।

जय हिन्द ।।।

वंदे मातरम् 🙏

व्यक्तिमत्वविकास का करावा???

व्यक्तिमत्व म्हणजे काय ?, ह्याबद्दल खूप जणांच्या मनात संभ्रम आहे. अनेकांना असे वाटते की व्यक्तिमत्व हे फक्त चांगला job मिळवण्यासाठी मर्यादित आहे. पण मित्रांनो असे नाही आहे कारण व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुमची शारीरिक,बौद्धिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, आणि अध्यात्मिक उन्नती.

एका उद्योजकांना प्रश्न विचारण्यात आला होता,”बेरोजगारी का वाढली आहे ?”, तर त्यांनी असे उत्तर दिले “रोजगार खूप प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यासाठी शिकलेले विद्यार्थीही आहेत पण त्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन (positive attitude), तसेच भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुठल्याही व्यक्तीला त्याच्या personal तसेच व्यावसायिक आयुष्यात यशस्वी बनण्यास मदत करतात.”

आपण अभ्यास करतो, चांगले गुणही मिळवतो, पण आपल्याला प्रश्न आणि उत्तरं माहीत असतात. आपल्याला ती समजून, पाठ करून परीक्षेत उत्तरे लिहायची असतात. पण जीवनात असे नसते. कधी, कुठे आपली परीक्षा असेल हे आपल्याला माहीत नसते. काय syllabus असेल, काय प्रश्न असतील, कुठले उत्तरं सर्वोत्तम असेल ह्याची आपल्याला जाणीव नसते. अश्या परिस्थितीत एकमेव गोष्ट जी आपल्याला साथ देते ती म्हणजे आपले व्यक्तित्व.

ह्या सर्व गोष्टींची जाणीव मला श्री.अमोल पालेकरांचा एक चित्रपट पाहिल्यावर झाली. त्यांनी साकारलेले पात्र चांगले शिक्षित असते, चांगली नोकरीही असते, पण त्यामध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमतेचा आणि संवादकौशल्याचा अभाव असतो. त्या पात्रास ह्या गोष्टींचा खूप त्रास होता असतो – कामामध्ये, नात्यामध्ये, आणि सामाजिक जीवनात. मग त्या पात्रास एका व्यक्ती बद्दल माहिती होते, ती व्यक्ती श्री.अशोक कुमार ह्यांनी साकारली होती. त्या चित्रपटात आपल्या विचारक्षमतेवर कसे काम करावे, कसे निर्णय घ्यावेत, ह्या अनेक गोष्टींचे training दाखवण्यात आले होते. त्या training मुळे ते पात्र आपल्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडवून आणते, हे त्या चित्रपटात पाहण्यासारखे होते.

तेव्हा एका गोष्टीची जाणीव झाली, व्यक्तीच्या जीवनात दोन स्थिती महत्वाच्या असतात – एक परिस्थिती आणि दुसरी म्हणजे मनस्थिती. जेव्हा परिस्थिती हावी होते तेव्हा अपयश येते आणि जेव्हा मनस्थिती बळकट असते तेव्हा व्यक्ती यशाकडे वाटचाल करतो. हीच मनस्थिती बळकट करण्याचे साधन म्हणजे व्यक्तिमत्व विकास…✍️

हर घर तिरंगा 🇮🇳

खरंतर आपला देश विविधतेने नटलेला देश आहे, पण ह्या विविधतेला एकरूप करणे जर कोणाला साध्य झाले तर तो आपला ‘तिरंगा’

जेव्हा हा ‘तिरंगा’ आकाशात फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान आणि शान अभिमानने उंचावते.

आपला भारत स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरा करणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाला नवीन दिशा दाखवण्यास सज्जही होणार आहे.

याचवर्षी आपल्या राष्ट्रगीताला जगातले सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. त्याच क्षणाला अजून अविस्मरणीय करण्याची संधी प्रत्येक भारतीयाला लाभणार आहे ती ‘हर घर तिरंगा’ ह्या मोहिमेतून.

या माझ्या भारतवासियांनो, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया. आपण सगळे मिळून ह्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार बनुया आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून, राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला वंदन करुया 🙏

अवकाशातूनही ह्या १५ ऑगस्टला दिसेल फक्त आपला ‘ तिरंगा ‘

जय हिंद !!!
जय तिरंगा !!!

Career after ITI (Marathi)

ITI नंतरचे करिअर, कोर्सेस आणि नोकरीच्या संधी

ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था. भारतीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या संस्था रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालनालय, कौशल्य आणि विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्या अंतर्गत स्थापन केल्या आहेत. या संस्थांचे मुख्य उद्दिष्ट भारतातील कुशल कामगार विकसित करणे हा आहे. संपूर्ण भारतात अनेक आयटीआय आहेत. दहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करणे हा आयटीआयचा मुख्य उद्देश आहे. एकदा विद्यार्थ्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला की, ITI नंतर करिअर करण्यासाठी भरपूर वाव असतो. या संस्था विद्यार्थ्यांना आयटीआय नंतर यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान प्रदान करतात

आयटीआय अभ्यासक्रमानंतर करिअरचे पर्याय

या आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी, व्यावसायिकांकडे विशेष कौशल्ये आणि ज्ञान असणे आवश्यक आहे आणि ते कसे लागू करावे हे माहित असणेही आवश्यक आहे. किंबहुना, ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्ये आहे त्यांना नोकरीची अधिक चांगली संधी भविष्यात असेल. त्यांच्या कौशल्यामुळे ते ITI नंतरच्या करिअरसाठी अधिक योग्य आहेत. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि हे विद्यार्थी उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या संधी शोधू शकतात. या दोन्ही पर्यायांची खाली चर्चा केली आहे.

उच्च शिक्षण – डिप्लोमा कोर्सेस

तांत्रिक किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे ITI प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक बाबींचा समावेश करून, अभ्यासक्रमांचे सखोल ज्ञान देऊन, तांत्रिक कौशल्य आणि अभियांत्रिकी कौशल्ये वाढविण्यात मदत करतात.

ATI

प्रगत प्रशिक्षण संस्था (एटीआय) आयटीआय विद्यार्थ्यांसाठी विशेष अल्पकालीन अभ्यासक्रम देतात. ATIs द्वारे ऑफर केलेले हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढविण्यास मदत करतात. नवीन करिअरची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते.

AITT

आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी निवडू शकणार्‍या पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे. AITT किंवा ऑल इंडिया ट्रेड टेस्ट ही नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे घेतली जाते. परीक्षा ही विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी आहे, जी 25 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी वर्षातून दोनदा घेतली जाते. CTS अंतर्गत नावनोंदणी केलेले आणि प्रशिक्षित झालेले उमेदवार, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT) साठी पात्र असतात. AITT यशस्वीरीत्या क्लिअर केल्यानंतर, प्रशिक्षणार्थींना त्या ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) दिले जाते. एनटीसी रोजगार/स्वयंरोजगाराच्या उद्देशाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या

सार्वजनिक/सरकारी क्षेत्र हे ITI च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे नियोक्ते मानले जाते आणि ITI नंतर करिअर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रेल्वे, PWD, BSNL, IOCL, ONGC आणि इतर अनेक सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) ITI विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात. ITI विद्यार्थी भारतीय सैन्य, भारतीय नौदल, BSF, CRPF आणि इतर निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या संधी देखील शोधू शकतात.

खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या

आयटीआयचे विद्यार्थी खाजगी उत्पादन आणि मेकॅनिक कंपन्यांमध्ये नोकरी शोधू शकतात, ज्यांना त्यांच्या व्यापाराच्या गरजेनुसार कुशल विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. आयटीआयनंतर विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी खासगी क्षेत्र उत्तम संधी उपलब्ध करून देते.

या कंपन्यांव्यतिरिक्त, आयटीआय विद्यार्थ्यांना कृषी, ऊर्जा बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर मेकॅनिक्सआणि इतर अनेक क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात.

परदेशात नोकरी

आयटीआयचे विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शोधू शकतील अशा करिअरच्या संधींपैकी ही एक आहे. भारताप्रमाणेच, इतर अनेक देशांना देखील व्यावसायिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे आयटीआयनंतर करिअर करू पाहणाऱ्यांसाठी परदेशात मोठ्या संधी आहेत.

स्वतःचा व्यवसाय

ITI नंतर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येऊ शकतो. अनेक योजना आहेत ज्या ITI विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. त्यातली एक म्हणजे मुद्रा कर्ज. व्यवसाय करण्याआधी विद्यार्थ्यांनी व्यवसायाची पूर्ण माहिती आणि लागणारे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना यशप्राप्ती होण्यास मदत होईल.

आयटीआय अभ्यासक्रमांची लोकप्रियता विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आहे कारण अभ्यासक्रम कौशल्यपूर्ण विकास प्रदान करतात. एक ते दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा गैर-अभियांत्रिकी व्यवसायातील कुशल व्यावसायिक म्हणून आयटीआयमधून बाहेर पडतात. हे अभ्यासक्रम सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही संस्थांद्वारे दिले जातात. भारत आणि परदेशात कुशल कामगारांना मोठी मागणी आहे. त्यामुळे ज्यांना आयटीआय नंतर यशस्वी करिअर शोधण्याची इच्छा आहे त्यांना आयटीआय एक उत्तम संधी प्रदान करते…✍️

Career Coach

” Tell me about yourself?”

To excel in a career, everyone has to face an interview. 

An interview is an inevitable part of our life and career. 

When we meet someone, ask us about our whereabouts; it is too one kind of interview. Try your best to answer those questions; it will help you to develop your interview skills.  

So one must always be prepared for an interview.

In professional interviews, an important question is ” Tell me about yourself?”. 

Many candidates though well-prepared, fail to answer this question. The reason is that most of the candidates answer this question monotonously. The candidate whose answer is professional and promising has more chances of cracking the interview.

A simple formula for answering, “Tell Me About Yourself?”

  • Talk a little bit about what your current role is, the scope of it, and perhaps a recent accomplishment. 
  • Talk about how you can be an asset to the job you’re applying for. 
  • Mention your previous experience relevant to the job and company you’re applying to.
  • Talk about your professional qualities and objectives.
  • Highlight your personality to break the ice.

How to prepare yourself for an interview :

  • Know yourself very well;
  • Understand your SWOT;
  • Develop your personality;
  • Develop your soft skills;
  • Develop your communication skills;
  • Work on your verbal and non-verbal communication;
  • Keep your attitude positive;
  • Do rehearsals
  • Practice

Aptitude tests (Marathi)

Aptitude tests तुमच्यातील कार्ये करण्याची आणि कामाच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याची क्षमता तपासतात. यामध्ये इतर गोष्टींसह समस्या सोडवणे, प्राधान्यक्रम आणि संख्यात्मक कौशल्ये यांचा समावेश होतो. ते बुद्धिमत्तेबरोबर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची (canditate) सर्वांगीण क्षमता बघतात.

अनेक नियोक्ते ( employer ) नियुक्ती प्रक्रियेसाठी Aptitude tests वर अवलंबून असतात. हे भर्ती करणार्‍याला उमेदवाराचा IQ, तर्कशास्त्र, शाब्दिक तर्क, व्यक्तिमत्व प्रकार आणि गणितीय कौशल्याचे मूल्यांकन करतात.

Aptitude training विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र आणि सामर्थ्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेपासून तयारीला सुरुवात करावी. शिष्यवृत्ती परीक्षांमुळे Aptitude test चा सराव होण्यास मदत होते. तसेच, Aptitude test मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली योग्यता, मूलभूत गोष्टी आणि वेळ व्यवस्थापन कौशल्यदेखील तयार होते.

Aptitude tests मध्ये 70% ते 80% हे किमान गुण लागतात. बर्‍याच उमेदवारांना वेळेत test पूर्ण करण्यात अडचणी येतात. Aptitude test मध्ये संख्यात्मक किंवा तार्किक तर्क चाचणींमध्ये, उमेदवारांना प्रश्न वाचण्यासाठी, आलेख आणि नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि योग्य प्रतिसाद निवडण्यासाठी सुमारे एक मिनिट असतो.

उमेदवारांनी Aptitude test ची तयारी अनेक आठवडे आधीच सुरू करणे गरजेचे आहे. कारण, अपयशाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे तयारीचा अभाव. नियमित अभ्यास, सराव आणि अभ्यास सामग्री ही Aptitude test मध्ये उत्तीर्ण होण्याची गुरुकिल्ली आहेत.

Aptitude test चे काही topics :

  • Average 
  • Blood relations
  • Boats and Streams 
  • Calendar 
  • Chain Rule 
  • Clocks 
  • Compound Interest 
  • Decimal Fractions 
  • Directions
  • H.C.F. and L.C.M of Numbers 
  • Heights & Distances 
  • Logarithms 
  • Operations on Numbers 
  • Partnership
  • Percentage
  • Permutations and Combinations 
  • Pipes and Cisterns 
  • Problems on Ages 
  • Problems on Numbers 
  • Problems on Trains
  • Profit and Loss 
  • Ratio and Proportion 
  • Simple Interest 
  • Simplification 
  • Time and Distance 
  • Time and Work 
  • Volume and Surface Area 

Aptitude tests मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काही tips :

  • दररोज सराव करा. सरावाने परिपूर्णता येते;
  • तुम्हाला Aptitude test चे स्वरूप माहित असल्याची खात्री करा;
  • सूचना काळजीपूर्वक वाचा;
  • तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या संबंधित प्रश्नांचा सराव करत असल्याची खात्री करा;
  • वेळचे नियोजन शिका.

Aptitude tests ची तयारी :

  • तुम्ही काटेकोरपणे पाळू शकता असा कोणताही सेट अभ्यासक्रम नाही, त्यामुळे basic concepts पासून सुरुवात करा;
  • Basic concepts नीट समजून घ्या;
  • सततचा सराव.

Positive Attitude ( सकारात्मक दृष्टीकोन )

माझ्या प्रशिक्षण सत्रांमध्ये मी माझ्या clients ह्यांना सकारात्मक दृष्टीकोन आणि ते किती महत्वाचे आहे हे समजून घेण्यास मदत करतो.

दृष्टीकोन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे, वस्तूकडे किंवा परिस्थितीकडे पाहण्याची वृत्ती. बर्‍याच लोकांना त्यांच्या मनोवृत्तीबद्दल किंवा वागण्यावर होणार्‍या परिणामाबद्दल भान नसते.

दृष्टिकोन दोन प्रकारचे आहेत: नकारात्मक किंवा सकारात्मक.

चला, सकारात्मक दृष्टीकोन काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

  • अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की सकारात्मक दृष्टीकोनामुळे तुमचे जीवन जगण्याचा दृष्टिकोन व्यापक आणि शक्यतांनी भरलेले बनते. सकारात्मक विचार ताण व्यवस्थापनास मदत करते आणि आपले आरोग्य सुधारू शकते;
  • एक सकारात्मक दृष्टीकोन मनाची अशी अवस्था आहे जी अनुकूल परिणामांची कल्पना करते आणि तशी अपेक्षा करते;
  • सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे सकारात्मक विचार. ही एक मानसिक वृत्ती आहे जी जीवनाच्या उज्ज्वल बाजूवर लक्ष केंद्रित करते. दुसर्‍या शब्दांत, सकारात्मक विचारसरणी ही अशी विचारांची निर्मिती करण्याची प्रक्रिया आहे जी ऊर्जेला वास्तविकतेत बदलते आणि रूपांतरित करते;
  • एक सकारात्मक मन आनंद, आरोग्य आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी समाप्तीची प्रतीक्षा करते;
  • सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे आयुष्यातील त्रासांकडे दुर्लक्ष करणे असे नाही. याचा अर्थ निराशावादी होण्याऐवजी आशावादी असणे आणि गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी शोधणे होय;
  • सकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक असते;
  • जीवनाच्या चढ-उतारांमध्ये ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे जीवनातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक आहे;
  • सकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक संधी आणते;
    सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला यशस्वी बनवते;
  • एक सकारात्मक वृत्ती आपल्याला त्याच्या placebo परिणामामुळे आजारापासून बरे होण्यास मदत करते;
  • एक सकारात्मक दृष्टीकोन आपली उपस्थिती आनंददायक बनवते;
  • सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला यशस्वी आयुष्याकडे घेऊन जाते.

मनाच्या सकारात्मक चौकटीत राहण्यासाठी येथे काही उपाय आहेतः

  • स्वत: ला जाणून घ्या;
  • कृतज्ञता ठेवा;
  • सकारात्मक लोकांची संगत ठेवा;
  • आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा;
  • आपल्या क्षमता आणि कौशल्ये वाढवा;
  • आपल्या आव्हानांची पूर्तता करा;
  • अपयश स्वीकारा;
  • आपल्या जीवनाचे वर्णन करण्यासाठी सकारात्मक शब्द वापरा;
  • तक्रार करायाचे थांबवां;
  • प्रत्येक गोष्टीत चांगले शोधण्याचा प्रयत्न करा;
  • प्राणायाम करा;
  • समस्यांचे निराकरण करा;
  • आनंदी रहा, हसा आणि इतरांना हसू द्या.

आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.

Be Positive 😊

समुपदेशक आणि Life Coach