An emotional quotient (EQ) or emotional intelligence is the ability to identify, assess, and control the emotions of oneself, others, and groups.
People with high EQ can :
Manage emotions;
Monitor emotions;
Label them appropriately;
Use emotional information to guide thinking and behavior;
Use them for positive thinking;
Identify, evaluate, control, and express their own emotions;
Understand emotional meanings.
People with high EQ generally achieve more, excel at teamwork and service, and take more initiative.
From an early age, encouraging qualities like sharing, thinking about others, putting oneself in another person’s shoes, giving space, and the general principles of cooperation can inculcate emotional awareness in children.
EQ is partially determined by how a person relates to others and maintains self-control. Through effective coaching, young adults can also enhance their EQ.
Some strategies for teaching emotional intelligence include offering character education, modeling positive behaviors, encouraging people to think about how others are feeling, and finding ways to be more empathetic toward others.
Many people think EQ is only about being good at interconnecting with people, which can be, but it starts with your self-perception and levels of self-awareness. The change will only happen when you are aware of your emotions…✍️
कुठलेही काम करताना talent हे लागतेच पण यशप्राप्तीसाठी talent बरोबर अनेक गोष्टीही लागतात, ज्या आज मी ह्या लेखात नमूद करत आहे.
असे मानले जाते की ह्या 10 गोष्टींचा व्यक्तीच्या यशामध्ये मोलाचा वाटा असतो.
_______________________________________________
1. Being on time
कोणीतरी खरे सांगितले आहे, ‘ वेळ कोणासाठी थांबत नाही ‘ म्हणून जेव्हा वेळ असतो तेव्हा त्याचा सदुपयोग करावा. गेलेली वेळ परत कधीच येत नाही. जो व्यक्ती आपले प्रत्येक काम वेळेत पूर्ण करतो, दुसऱ्यांना दिलेली वेळ पळतो, तसेच वेळेची कदर करतो, तोच यशस्वी होतो.
_______________________________________________
2. Making an effort
खूप वेळा असे होते की लोकं अपयशाला कंटाळून प्रयत्न सोडून देतात. पण काही लोकं कितीही अपयश आले तर तग धरून प्रयत्न चालू ठेवतात आणि पुढे तेच यशसवी होतात. प्रयत्नशील व्यक्ती नेहमी यशाकडे वाटचाल करत असतो.
_______________________________________________
3. Being high energy
काही लोकं खूप हुशार असतात पण त्यांच्यात उत्साह कमी असतो. त्याची अनेक कारणे असू शकतात जसे की योग्य आहार न घेणे, प्राणायाम व व्यायाम न करणे, चिडचिडा स्वभाव असणे. ज्या व्यक्तींमध्ये energy level जास्त असते ते जास्तवेळ काम करू शकतात व यशस्वी होतात.
_______________________________________________
4. Having a positive attitude
Attitude म्हणजे दृष्टिकोन. आजकाल companies knowledge पेक्षा Positive Attitude ला जास्त महत्व देतात. सकारात्मक दृष्टिकोनामुळे कठीण परिस्थितीवर ही मात करता येते.
_______________________________________________
5. Being passionate
असे म्हणतात कुठले ही काम करत असाल तर ते मनापासून करावे. तुम्ही किती हुशार आहात ह्यापेक्षा त्या कामाची तुम्हाला आवड किती आहे ह्याच्यावर तुमचा आनंद आणि यश अवलंबून असते.
_______________________________________________
6. Good body language
तुमचे संवाद कौशल्य तुमच्या verbal आणि non-verbal communication वर अवलंबून असते. Non-verbal communication म्हणजे तुमच्या चेहऱ्याचे हावभाव, तुमचा आवाज, तुमची देहबोली होय. असे म्हणतात ज्याचे non-verbal communication चांगले असते त्याला यश प्राप्तीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
_______________________________________________
7. Being coachable
सतत शिकत राहणे, स्वतःला विकसित ठेवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी शिकण्याची वृत्ती जोपासणे आवश्यक आहे.
_______________________________________________
8. Doing a little extra
अनेक लोक जेवढे काम सांगितले आहे तेवढेच करतात. त्यामुळे त्यांची क्षमता मर्यादित राहते. नेहमी आपण काम अजून किती चांगल्या प्रकारे करू शकतो ह्याचा विचार होणे गरजेचे आहे आणि शक्य असल्यास थोडे जास्तच काम नक्की करावे.
_______________________________________________
9. Being prepared
एक म्हण खूप प्रचलित आहे ‘ तहान लागल्यावर विहीर खणणे ‘ ह्याचा अर्थ शेवटच्या क्षणी काम करणे होय. एखादे काम आपण हातात घेतले की त्या कामासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवणे आवश्यक असते. तुमचा आत्मविश्वास तुम्ही केलेल्या तयारीवर अवलंबून असतो.
_______________________________________________
10. Having Work ethics
कुठलेही काम करताना त्या कामाबदल आपली निष्ठा आणि आपली नीतिमत्ता असणे महत्वाचे असते. नीतिमत्तेने काम केल्यास आपल्याला कामामध्ये आनंद आणि यशप्राप्ती मिळण्यास मदत होते.
माझ्या प्रशिक्षण सत्रांमध्ये मी माझ्या clients ह्यांना सकारात्मक दृष्टीकोन आणि ते किती महत्वाचे आहे हे समजून घेण्यास मदत करतो.
दृष्टीकोन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे, वस्तूकडे किंवा परिस्थितीकडे पाहण्याची वृत्ती. बर्याच लोकांना त्यांच्या मनोवृत्तीबद्दल किंवा वागण्यावर होणार्या परिणामाबद्दल भान नसते.
दृष्टिकोन दोन प्रकारचे आहेत: नकारात्मक किंवा सकारात्मक.
चला, सकारात्मक दृष्टीकोन काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की सकारात्मक दृष्टीकोनामुळे तुमचे जीवन जगण्याचा दृष्टिकोन व्यापक आणि शक्यतांनी भरलेले बनते. सकारात्मक विचार ताण व्यवस्थापनास मदत करते आणि आपले आरोग्य सुधारू शकते;
एक सकारात्मक दृष्टीकोन मनाची अशी अवस्था आहे जी अनुकूल परिणामांची कल्पना करते आणि तशी अपेक्षा करते;
सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे सकारात्मक विचार. ही एक मानसिक वृत्ती आहे जी जीवनाच्या उज्ज्वल बाजूवर लक्ष केंद्रित करते. दुसर्या शब्दांत, सकारात्मक विचारसरणी ही अशी विचारांची निर्मिती करण्याची प्रक्रिया आहे जी ऊर्जेला वास्तविकतेत बदलते आणि रूपांतरित करते;
एक सकारात्मक मन आनंद, आरोग्य आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी समाप्तीची प्रतीक्षा करते;
सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे आयुष्यातील त्रासांकडे दुर्लक्ष करणे असे नाही. याचा अर्थ निराशावादी होण्याऐवजी आशावादी असणे आणि गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी शोधणे होय;
सकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक असते;
जीवनाच्या चढ-उतारांमध्ये ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे जीवनातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक आहे;
सकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक संधी आणते; सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला यशस्वी बनवते;
एक सकारात्मक वृत्ती आपल्याला त्याच्या placebo परिणामामुळे आजारापासून बरे होण्यास मदत करते;
एक सकारात्मक दृष्टीकोन आपली उपस्थिती आनंददायक बनवते;
सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला यशस्वी आयुष्याकडे घेऊन जाते.
मनाच्या सकारात्मक चौकटीत राहण्यासाठी येथे काही उपाय आहेतः
स्वत: ला जाणून घ्या;
कृतज्ञता ठेवा;
सकारात्मक लोकांची संगत ठेवा;
आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा;
आपल्या क्षमता आणि कौशल्ये वाढवा;
आपल्या आव्हानांची पूर्तता करा;
अपयश स्वीकारा;
आपल्या जीवनाचे वर्णन करण्यासाठी सकारात्मक शब्द वापरा;
तक्रार करायाचे थांबवां;
प्रत्येक गोष्टीत चांगले शोधण्याचा प्रयत्न करा;
प्राणायाम करा;
समस्यांचे निराकरण करा;
आनंदी रहा, हसा आणि इतरांना हसू द्या.
आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.
भावनिक बुद्धिमत्ता (EQ) ही स्वतःची आणि इतरांची भावना ओळखण्याची, मूल्यांकन करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता आहे.
उच्च EQ असलेले लोक हे चांगल्या प्रकारे करू शकतात:
भावना व्यवस्थापण;
भावनांचे निरीक्षण करणे;
विचार आणि वर्तन मार्गदर्शन करण्यासाठी भावनिक माहितीचा वापर करणे;
सकारात्मक विचारसरणीसाठी त्यांचा वापर करा;
त्यांच्या स्वतःच्या भावना ओळखणे, मूल्यांकन करणे, नियंत्रण करणे आणि व्यक्त करणे;
भावनिक अर्थ समजून घेणे.
उच्च EQ असलेले लोक सामान्यत: कार्यसंघ आणि सेवेत उत्कृष्ट कामगिरी साध्य करतात आणि अधिक पुढाकार घेतात.
लहानपणापासूनच दुसर्यांबद्दल विचार करणे आणि सहकार्याच्या सामान्य तत्त्वांमुळे मुलांमध्ये भावनात्मक जागरूकता वाढू शकते.
एखादी व्यक्ती इतरांशी कशी संबंध ठेवते आणि आत्म-नियंत्रण कसे ठेवते यावर EQ अंशतः निश्चित केले जाते. प्रभावी कोचिंगद्वारे लहान तसेच प्रौढ, हे आपल्यातील EQ वाढवू शकतात..
भावनिक बुद्धिमत्ता शिकविण्याच्या काही धोरणांमध्ये सकारात्मक वर्तनांचे मॉडेलिंग करणे, इतरांना कसे वाटते याबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित करणे आणि इतरांबद्दल अधिक सहानुभूती दाखवण्याचे मार्ग शोधणे, हे समाविष्ट आहे.
बर्याच लोकांना असे वाटते की EQ फक्त इतर लोकांशी परस्पर कनेक्ट करण्यातच चांगले आहे, जे असूही शकते, परंतु ते आपल्या आत्म-आकलनापासून आणि आत्म-जागरूकता पातळीपासून सुरू होते. जेव्हा आपल्याला त्याबद्दल माहिती व आपला त्या दिशेने सराव असेल, तेव्हाच हा बदल होईल.
‘ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ही म्हणच सांगून जाते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ‘आई’ चे महत्त्व काय आहे ते.
जन्माला आलेल्या बाळाची जगाशी झालेली पहिली ओळख म्हणजे ‘आई ‘. बाळाचे प्रथम गुरू म्हणजे ‘आई’, मग जर उत्कृष्ट शिष्य घडवायचा असेल तर प्रथम गुरू ने त्याला उत्कृष्ट शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. बाळ आपल्या आईला बघूनच बोलायला शिकते , ते आई जी भाषा बोलते तीच भाषा प्रथम शिकते म्हणूनच तर तिला ‘मातृभाषा’ असे संबोधले जाते. ‘आई’ म्हणजे मुलांच्या जीवनातील एक आधारस्तंभ , हा आधारस्तंभ जेवढा सक्षम, आनंदी, सकारात्मक तेवढेच मुलांचे जीवन सक्षम, आनंदी आणि सकारात्मक होते.
खरेच ‘आई’ होणे म्हणजे एक मोठी शक्ती, एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलण्याची क्षमता सुद्धा निसर्गाने त्या ‘आई’ मध्ये दिलेली असते. मुलांच्या जडणघडण होण्यामध्ये सर्व परिवाराचे योगदान असतेच, पण ‘आई’ चे योगदान नेहमीच कांकणभर जास्त असते.
जर एखाद्या मातेला वाटत असेल की आपल्या पाल्यांनी हुशार बनावे, सुखी व्हावे, स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करून समाज व देशाचा विकसात हातभार लावावा तर प्रत्येक मातेला त्याचे शिक्षण आपल्या मुलांना असे दिले पाहिजे , जसे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या माँसाहेबांनी दिले.
प्रत्येक मातेला वाटत असते की आपल्या मुलाने जगात स्वतःचे नाव करावे, प्रतिष्ठा मिळवावी, पण हे साध्य तेव्हाच होईल जेव्हा आई त्या मुलासमोर स्वतःच्या रूपाने उदाहरण ठेवेल तेव्हा. आपल्या मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर आईने स्वतःमध्ये अभ्यासु वृत्ती जोपासली पाहिजे. जर वाटत असेल की आपल्या मुलांनी सकारात्मक विचार करावा तर तो कसा करावा ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले पाहिजे. जेव्हा मुलांसमोर आई सुखी, सकारात्मक व यशस्वी आयुष्य कसे जगावे ह्याचे उत्तम उदाहरण पेश करेल तेव्हा मुलांना समजून घेणे आणि समजून सांगणे आईला सोपे जाईल.
आई असणे एक शक्ती आहे आणि त्या शक्ती बरोबरच आपसूक मोठी जबाबदारी येते. मला ‘स्पायडर मॅन’ मधील एक dialogue नमूद करावा असे वाटते – “Great Powers bring Great Responsibilities” व ती पेलण्यासाठी प्रत्येक आईने स्वतःला सक्षम बनविलेच पाहिजे , तरच हा समाज व देश सक्षम बनेल.
माझ्या मित्रांनो, खरंच सांगायचे तर, आपल्या जगाला खरोखरच श्रीमंत लोकांपेक्षा अधिक आनंदी लोकांची आवश्यकता आहे आणि मला माहित आहे की आपण स्वतःच्या आणि आपल्या सभोवताल पाहिलं तर आपण नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल.
आजकाल आपल्याकडे सर्व काही आहे, परंतु तरीही असे वाटते की काहीतरी हरवले आहे.
आणि ती गोष्ट म्हणजे आनंद ☺️
आपण आनंदाचा सर्वत्र शोध घेतो परंतु आपल्याला तो सापडत नाही. आपल्या अपयशाचे मूळ कारण हे आहे की आपण आनंद स्वतःमध्ये शोधण्याऐवजी बाहेर शोधत आहोत.
अनेकांना वाटत असेल की खरोखर आनंदी जीवन आणि आनंद म्हणजे काय; आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक अवस्था आहे ज्यात समाधानापासून सकारात्मक भावनांचा समावेश आहे.
मी आनंदावर एक सुंदर व्हिडिओ पाहिला होता, त्या व्हिडिओमध्ये नमुद करण्यात आलेले काही मुद्दे :
आपण सर्व विचार करतो –
कठोर परिश्रम ► यश ►आनंद
पण प्रत्यक्षात ;
आनंद ► कठोर परिश्रम ► यश
म्हणजेच आनंदामुळे समृद्धी येते.
आपण जगातील सर्वात आनंदी देश आणि समृद्ध देशांची सूची पाहिल्यास आपल्याला दोन्ही यादीमध्ये जवळजवळ समान नावे आढळतील. हे सिद्ध करते की “आनंद समृद्धी आणतो”.
आनंद संक्रमक आहे, जर आपण आनंदी असाल तर आपले कुटुंब, मित्र आणि नातेवाईक अधिक आनंदी होतील. आनंद आपल्यामध्ये सकारात्मक बदल आणतो, ज्यामुळे आपला आत्म-विकास होतो.
एक आनंदी व्यक्तीमध्ये अनेक चांगले गुण आढळून येतात, जसे की :
आनंदी राहणे, खरोखर आपले आयुष्य परिपूर्ण जगण्यास मदत करते. हे आपल्याला यश आणि समृद्धी तसेच आपल्या देशाच्या यश आणि समृद्धीमध्ये मदत करते. एक आनंदी आणि सकारात्मक व्यक्ती 1000 हून अधिक लोकांना आनंदी करू शकते. आपणास खरोखर जगामध्ये बदल हवा असेल तर प्रथम आपण आपल्या पातळीवर तो बदल करणे आवश्यक आहे.
जग आनंदी लोकांनी परिपूर्ण आहे आणि आपल्याला एकही सापडत नसेल तर या वर्षी तुम्ही एक व्हा.
बदल करण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणा.
आपल्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आनंदी व्यक्ती व्हा.
‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ ही मराठी serial बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एखाद्या मराठी माणसाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी, त्याला मागे खेचण्यासाठी बाहेरच्यांपेक्षा जवळची व ओळखीची व्यक्ती किती कारणीभूत असतात ते. साक्षात शिवपुत्राला स्वकीयांकडूनच जर एवढा त्रास होऊ शकतो तर प्रगती करणाऱ्या सामान्य व्यक्तीला किती त्रास होत असेल. हो नक्कीच होत असणार, म्हणूनच तर मराठी माणूस एवढा शूरवीर, धाडसी तरी तो नेहमी आपल्या पाठीवर ढाल घेऊन असतो कारण त्याला कुठेतरी माहीत असते की आपल्यावर चुकून ही वार झाला तर तो पाठीवरची होईल, आणि तो करणारे आपलेच असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून ते वारंवार सिद्ध झाले आहे.
पण, एक मराठी माणूस म्हणून मला एक प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याच माणसाला मागे खेचून काय फायदा होत असेल ? , कारण एखाद्याला मागे खेचताना मागे खेचणारा व्यक्ती ही आपसूक मागेच जातो , म्हणजेच ना त्याची प्रगती होत ना दुसऱ्याची , किती संकुचित वृत्तीचे प्रमाण असेल हे. ह्याच वृत्तीमुळे, मराठी समाज ज्याची धमक दिल्ली वर राज्य करण्याची आहे , तो समाज ७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही एकही पंतप्रधान देऊ शकला नाही. चित्रपटसुष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली पण आज एकही मराठी नट किंवा नटी Bollywood मध्ये top ला सध्या तरी नाही. ज्या क्रिकेट टीम मध्ये अर्ध्याहून अधिक मराठी players असायचे त्या टीम मध्ये आता मराठी player कधीतरी दिसतो. जे राज्य कधी पहिल्या स्थानावर होते ते आता सहाव्या स्थानावर आहे. ह्या सगळ्याला कुठेतरी आपली संकुचित वृत्तीच कारणीभूत असावी ह्याला दुमत नसावे.
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना ही स्वराज्य स्थापन करताना स्वकीयांकडून त्रास झाला होता, आणि तो मोडून काढत महाराजांनी अखेर स्वराज्य स्थापन केलेच. ते नेहमी म्हणत ‘स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ‘ , म्हणजेच ज्यांनी स्वराज्याला विरोध केला त्यांनी कुठेतरी श्रींच्या आशीर्वादाबद्दलच प्रश्न चिन्ह उभे केले. कितीही उलटसुलट प्रयत्न झाले तरी अखेरीस स्वराज्य स्थापन झालेच. म्हणजेच एखाद्याने जीवनात आनंदी व्हावे , समृद्ध व्हावे , प्रगत व्हावे ही जर श्रींची इच्छा असेल तर कोणी कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी अखेरीस सगळे शुभच होते. म्हणूनच तर संभाजी महाराजांना एवढा त्रास देऊन , त्यांची अडवणूक करून सुद्धा ते आज मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवतात, आणि त्यांना आडवे जाणाऱ्यांना कोणी चिटपाखरूही ओळखत नाही.
प्रगती करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मग एखाद्याने प्रगती केली किंवा त्याचे नाव मोठे झाले तर आपले नुकसान होईल असे मनात येण्याचे काहीच कारण नाही.
मी काही ओळी नमूद करू इच्छितो…
स्वतःचा विचार नक्कीच व्हावा पण त्यात स्वार्थ नसावा । एखाद्यावर राग असू शकतो पण त्यावर द्वेष व मत्सर नसावा। श्रींच्या दयेने आयुष्य सगळ्यांना लाभले आहे ते समृद्ध बनवण्यासाठीच, झालेच तर सर्वांचा त्यास हातभार असावा ।
म्हणूनच जर मराठी बाणा व कणा ताठ ठेवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाला ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे सूत्र पाळावेच लागेल. जेव्हा असे होईल तेव्हा आपण नक्कीच असे अभिमानाने म्हणू की ‘दिल्लीचे ही तक्त राखतो आणि राज्यही करतो महाराष्ट्र माझा’ ।।
Through self-development, one can achieve Skill development.
Improved training and skill development are critical for providing decent employment opportunities to the growing youth population. It should aim to empower all individuals through improved skills, knowledge, and qualifications to provide access to decent employment.
Self-development is a lifelong process. It is a way for people to assess their skills and qualities, consider their aims in life, and set goals to realize and maximize their potential.
Self-development can be initiated or achieved in personality development sessions and training. It covers activities that improve awareness and identity and develop talents.
The topics can encompass anything that involves your transformation as a person. It means becoming the best you can be and reaching your potential. It is usually achieved by looking internally and then changing your action externally. It demands a lot of effort, knowledge, passion, and dedication.
Self-development sessions should be able to create the following results among students/participants:
Improved self-awareness;
Improved self-knowledge;
Improved skills by learning new ones;
Building or renewing identity/self-esteem;
Developed strengths or talents;
Improvement in a career;
Identifying potentials;
Employability;
Enhancement of lifestyle, the quality of life, and time management;
Improvement of health;
Improvement of wealth or social status;
Improvement in social relations or emotional intelligence.