प्रिय मित्रांनो,
आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की जसे आपली मराठी आपली राज्य भाषा आहे , तसेच हिंदी आणि English राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहेत, म्हणजेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या भाषेंचा उपयोग जास्त होतो. आपल्या रोजच्या जीवनात ह्या तिन्ही भाषेंचा वापर थोडे अधिक प्रमाणात होतो.
पुणे , मुंबई सारख्या शहरांमध्ये interview आणि व्यावहारिक संवाद बहुतेक हिंदी किंवा English मध्येच होतात, ह्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी ह्याच दोन्ही भाषेंचा उपयोग जास्त होतो. काही मुले अभ्यासात खूप हुशार असतात पण जेव्हा पुढचे शिक्षण किंवा नोकरीसाठी शहरांमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा हिंदी आणि English भाषेबरोबर communication skills, soft skills, आणि presentation skills मोठा अडसर ठरतात. मुलांनी त्यांच्या शालेय जीवनात हिंदी आणि English बोलण्याचा सराव कमी किंवा केलाच नाही तर ह्या दोन्ही विषयात चांगले गुण असूनही ही त्या भाषेत स्वतःला express करणे त्यांना अवघड जाते.
तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन तुमच्या Personality, Spoken English, Grammar and Vocabulary मध्ये सुधारणा केली की तुमची बोलतांना होणाऱ्या चुकांची तुम्हाला सुधारणा करता येईल. पण fluent भाषा बोलण्यासाठी एक अट असते, ती म्हणजे तुम्ही हिंदी/English योग्यरित्या बोलायला शिकल्यावर तिचा सराव केला नाही तर कालांतराने तुम्ही जिथे होता तिथेच परत जाणार. म्हणून तुमच्या बरोबर तुमच्या आप्तेष्ट किंवा मित्रांनाही हिंदी आणि English बोलण्यास प्रोत्साहित करा, म्हणजे सराव करायला सवंगडी मिळतील.
जर आपला मित्र परिवार आपल्याशी थोडे हिंदी आणि English मध्ये बोलू लागला तर आपणही मराठी भाषेबरोबर हिंदी आणि English भाषेंवरही प्रभुत्व मिळवू शकतो. तुमच्या बरोबर त्यांनाही उपयोग होईल कारण प्रगती ही एकट्याची कधीच होत नसते, ती होते तर सगळ्यांबरोबर…
आपला मित्र,
अमोल दीक्षित












